Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

महिनाभरात १५ कोटींच्या ठेवसंकलनाचे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे उद्दिष्ट

Advertisements
अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृद्धी मासाचा उद्या (दि.. २० जून) प्रारंभ होत असून पतसंस्थेने महिनाभरात १५ कोटींच्या ठेवसंकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाचा प्रारंभ होत आहे. या ठेववृद्धी मासाचे स्वरूप उत्सवी झाले असून यात १५ कोटी ठेवींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पतसंस्थेच्या सर्व १७ शाखा ठेवी स्वीकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

ठेववृद्धी मासानिमित्त आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ठेववृद्धी मासानिमित्त स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवीदार गुंतवणूक करतात. ठेववृद्धी मासात जमा होणाऱ्या ठेवींमुळे विश्वासार्ह प्रतिमेची खूणगाठ अधोरेखित होते. पारंपरिक आणि नवनवीन गुंतवणूकदार ठेवीदार संस्थेच्या परिवारात समाविष्ट होत असतात. स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास केवळ आर्थिक व्यवहार राहिला नसून पतसंस्थेच्या उत्तम वाटचालीमुळे पतसंस्था आणि ग्राहक यांच्यामध्ये निर्माण झालेले स्नेहाचे, आपुलकीचे, विश्वासाचे बंध जपणारा, ते वृद्धिंगत करणारा हा खऱ्या अर्थाने अर्थमहोत्सव झाला आहे.

पतसंस्थेच्या स्वरूपांजली ठेव योजनेत १२ ते १८ महिने मुदतीसाठी सर्वसाधारण ठेवीदारांना ८ टक्के, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ८.२५ टक्के व्याजदर आहे. सोहम ठेव योजनेत १९ ते ३६ महिन्यांसाठी मासिक व्याज योजनेत ८.२५ टक्के सर्वसाधारण ग्राहकांसाठी तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ८.५० टक्के व्याजदर आहे. गतवर्षी या महोत्सवात ८९९ ठेवीदारांनी १२ कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवी संस्थेकडे गुंतवल्या होत्या. यंदा १५ कोटींच्या ठेवी संकलित करण्याचे उद्दिष्ट संस्थेला खुणावत आहे. ठेवीदारांचे स्वागत करण्यासाठी १७ शाखा सज्ज आहेत. यात मोठी गुंतवणूक करून सहकार चक्र अधिक गतिमान करताना आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वांचे योगदान मिळत राहो, अशी अपेक्षा ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version