Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

स्वरूपानंद पतसंस्थेत उद्दिष्टापेक्षा ३.३७ कोटीच्या अधिक ठेवी जमा

Advertisements

रत्नागिरी : विश्वासार्हता हा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा स्थायीभाव असल्याची प्रचीती देणारा ठेववृद्धी मास आज सुफल संपन्न झाला. उद्दिष्टापेक्षा तब्बल ३.३७ कोटी रुपयांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

गेल्या २० जूनपासून सुरू झालेला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास आज पूर्ण झाला. त्याविषयीची माहिती देताना श्री. पटवर्धन म्हणाले की, ठेववृद्धी मासाला सर्वच शाखांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण १२७७ खात्यांमध्ये १८ कोटी ३७ लाखाच्या ठेवी संकलित झाल्या. रत्नागिरी शाखा ३ कोटी ६७ लाखाच्या ठेवी संकलित करून प्रथम, मारुती मंदिर शाखा २ कोटी ९६ लाखांच्या ठेवी संकलित करून दुसऱ्या, तर १ कोटी ८७ लाखांच्या ठेव संकलित करून तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या ठेव वृद्धी मासात २४३ नव्या ठेवीदारांनी ठेव गुंतवली.

संस्थेच्या एकूण ठेवी २७९ कोटी ४२ लाखापर्यंत पोहोचल्या असून संस्थेने १५ कोटींचे ठेवलेले उद्दिष्ट दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले. आज नवा उच्चांक संस्थेच्या ठेवीदारांनी प्रस्थापित केला. भरभरून मिळालेला प्रतिसाद हे संस्थेच्या विश्वासार्हतेचे गमक आहे. आर्थिक शिस्त, नेटके आर्थिक नियोजन, जनसामान्यांपर्यंतचा संपर्क, संस्थेची स्वच्छ प्रतिमा या बळावर स्वरूपानंद पतसंस्थेने सातत्यपूर्ण भरीव कामगिरी केली आहे, असे श्री. पटवर्धन म्हणाले.

हा प्रतिसाद संस्थेच्या सुरक्षित आणि भक्कम आर्थिक स्थितीवर जनमानसात प्रचंड विश्वास असल्याचे दाखवतो. भरभरून मिळालेल्या प्रतिसादाने मन भावनाप्रधान झाले असून हा प्रतिसाद ऊर्जा देणारा आहे. सर्व ठेवीदारांना शतशः धन्यवाद देताना संस्थेचे अर्थकारण याच नेमस्त पद्धतीने पुढे जाईल, याची ग्वाही ॲड.पटवर्धन यांनी दिली आहे. संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे, असेही ते म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version