स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी ठेव वृद्धी मासाचा प्रारंभ

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ठेववृद्धी मास प्रतिवर्षी २० जून ते २० जुलै या काळात साजरा करते. यावर्षीचा ठेववृद्धी मास पंचविसावा असून तो सुरू झाल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली.

ते म्हणाले, गेली सलग २५ वर्षे ठेव वृद्धी मासाच्या माध्यमातून ठेवीदारांशी संपर्क करत पतसंस्थेने ठेव संकलन केले आहे. पतसंस्था सुरू झाली, तेव्हा केवळ प्रधान कार्यालय होते. तालुका कार्यक्षेत्र होते. आज १७ शाखा आणि महाराष्ट्र कार्यक्षेत्र झालेली ही स्वरूपानंद पतसंस्था ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार ग्राहक सेवेचे हे व्रत मानून गेली ३० वर्षे पतसंस्था मार्गक्रमण करत आहे. उत्तम आर्थिक स्थिती राखत, सातत्यपूर्ण निव्वळ नफ्यात राहत, वसुलीचा विक्रम अबाधित ठेवत पतसंस्थेचे मार्गक्रमण सुरू आहे. आज ७० हजार ७०२ ठेव खाती पतसंस्थेकडे आहेत. मोठ्या प्रमाणावर ग्राहक ठेवीदार सभासदांचा प्रतिसाद सातत्याने प्राप्त करत ठेव वृद्धीबरोबर ठेवीदार सभासद संस्थेतही पतसंस्थेने प्रचंड वाढ केली आहे.

ठेववृद्धी मासात स्वरूपांजली ठेव (१२ ते १८ महिने) सर्वसाधारण व्याजदर ७.३५ टक्के, ज्येष्ठ नागरिक/महिलांसाठी व्याजदर ७.६० टक्के, सोहम ठेव योजना (१९ ते ६० महिने-मासिक व्याज) सर्वसाधारण व्याजदर ७.५० टक्के, ज्येष्ठ नागरिक/महिलांसाठी व्याजदर ७.७५ टक्के अशा आकर्षक योजना संस्थेने जाहीर केल्या आहेत. या योजनांमध्ये आपली ठेव गुंतवणूक ठेवीदारांनी आकर्षक व्याज दराने लाभार्थी व्हावे, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले आहे.

स्वरूपानंद संस्थेकडे आज २२७ कोटींच्या ठेवी, तर ९९ टक्के वसुली आहे. गेली २९ वर्षे लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग असून संस्थेच्या गुंतवणुका १०१ कोटी असून स्वनिधी २७ कोटी आहे. आर्थिक सुदृढता राखत संस्थेने अर्थकारण केले आहे. गेल्या ५ वर्षांतील ठेव वृद्धी मासाचा ठेव संकलनाचा आलेख चढता आहे. ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास प्रतीत करणारी ही आकडेवारी नमूद करताना खूप समाधान होते. सन २०१६ साली ५ कोटी १० लाखाच्या ठेवी ठेव वृद्धी मासात जमा झाल्या. सन २०१७ मध्ये ६ कोटी १३ लाख ठेव संकलित झाली. सन २०१८ च्या ठेव वृद्धी मासात ७ कोटी १८ लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. सन २०१९ मध्ये ११ कोटी ४३ लाखांचे ठेव संकलन झाले. तर करोनाग्रस्त सन २०२० च्या ठेव वृद्धी मासात ९ कोटी २१ लाखांचे ठेव संकलन झाले. रौप्य महोत्सवी ठेव वृद्धी मासात १० कोटींचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी नव्या-जुन्या सर्व ठेवीदारांनी या ठेव वृद्धी मासाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply