रत्नागिरी जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर ४.६५ टक्के

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ जून) करोनाचे नवे ३८८ रुग्ण आढळले. त्यामध्ये यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या १३७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ४.६५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ६५, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १८६ (दोन्ही मिळून २५१). आधीच्या तारखेनुसार १३७ रुग्णांची आज नोंद झाली. त्यांच्यासह आजच्या रुग्णांची संख्या ३८८ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४७ हजार ४५१ झाली आहे. आज झालेल्या चाचण्यांच्या तुलनेने जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आजचा दर ४.६५ टक्के आहे. हा दर केवळ आजच्या आकडेवारीवर आधारित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.३५ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार ४३८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज पाच हजार ३९५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ४२ हजार ६५९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३३० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ४० हजार ३९० झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८५.११ टक्के आहे.

जिल्ह्यात कालच्या ८ आणि आजच्या ८ अशा १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ६२३ झाली आहे. मृत्युदर ३.४२ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४८५, खेड १६०, गुहागर १३९, दापोली १३०, चिपळूण ३०६, संगमेश्वर १८६, लांजा ८९, राजापूर ११५, मंडणगड १३. (एकूण १६२३).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply