स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा नववर्ष ठेववृद्धी मास १ जानेवारीपासून

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ १ जानेवारीपासून सुरू होत असून २०२६ सालचे स्वागत करतानाच स्वरूपानंद ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याच्या समीप आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.

महिला पतसंस्था जपतेय सामाजिक बांधिलकी : डॉ. सोपान शिंदे

रत्नागिरी : जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने महिलांसाठी रक्तातील साखर आणि नेत्र तपासणीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मी प्रथमच पाहतोय की सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कर्जदाराला मदत दिली जाते. ही महिलांची संस्था असल्यानेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.

खारवी समाज पतसंस्थेच्या खंडाळा शाखेचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या खंडाळा शाखेचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले.

खारवी पतसंस्थेच्या दोघींचा राज्य पतसंस्था फेडरेशनकडून सन्मान

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ. दीप्ती देवेंद्र कोळथरकर आणि कु. प्रथमा मिरजुळकर या दोघींचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सन्मान केला.

खारवी समाज पतसंस्थेच्या शृंगारतळी शाखेचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या शृंगारतळी (ता. गुहागर) येथील शाखेचे आज मोठ्या थाटात उद्घाटन झाले.

खारवी समाज पतसंस्थेला नव्या ५ शाखांसाठी मंजुरी

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ५ शाखा सुरू करायला सहकार खात्याची मंजुरी मिळाली आहे.