सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १९ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७५४ तर एकूण ३० हजार १६५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात ६ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुबार तपासणी केलेल्या दोघांसह ४९२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९४, दोडामार्ग – २५, कणकवली – ८१, कुडाळ – ८३, मालवण – ९६, सावंतवाडी – ४०, वैभववाडी – ३७, वेंगुर्ले – ३४. एकूण करोनाबाधितांची संख्या ३७ हजार १२३ झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७३४, दोडामार्ग २०८, कणकवली १०५८, कुडाळ १२०३, मालवण १०८६, सावंतवाडी ७३६, वैभववाडी ३०६, वेंगुर्ले ६६३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २९. सक्रिय रुग्णांपैकी ३४८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९२९ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, दोडामार्ग १, मालवण ३, सावंतवाडी १, वैभववाडी १, वेंगुर्ले २.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १२९, दोडामार्ग – २८, कणकवली – १८२, कुडाळ – १४२, मालवण – १७२, सावंतवाडी – १३६, वैभववाडी – ६३, वेंगुर्ले – ७२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.
Follow Kokan Media on Social Media

