करोनाग्रस्तांसाठी जनकल्याण समितीचे मोफत सल्ला केंद्र

सावंतवाडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे करोनाबाधित रुग्णांकरिता डॉक्टरांचे एक पथक विविध विषयांवरील मोफत सल्ल्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पथकातील डॉक्टर्स, त्यांचा विषय आणि संपर्क क्रमांक इत्यादी तपशील असा –

१) डॉ. रेवती लेले – करोना प्रतिबंधासाठी आणि करोनामुक्त रुग्णांसाठी योग, प्राणायाम आणि योगनिद्रा (संपर्क क्रमांक 7798682017).
वेळ – सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी ५.०० ते ६.००.

२) डॉ. राजशेखर कार्लेकर – करोनाची लक्षणे, तपासण्या आणि उपचार याविषयी माहिती (संपर्क क्रमांक 9422373067). वेळ – सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी ४.०० ते ५.००.

३) डॉ. रश्मी कार्लेकर – करोनाकाळातील तणावासाठी रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मानसिक समुपदेशन (संपर्क क्रमांक 9423856637). वेळ – सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी ५.०० ते ६.००.

४) डॉ. शुभदा करमरकर – करोनासाठी आयुर्वेदीय पथ्य-अपथ्य, उपचार यांची माहिती तसेच योग आणि प्राणायाम (संपर्क क्रमांक 9421190388). वेळ – सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी ४.०० ते ५.००.

५) डॉ. गौरी गणपत्ये – करोना असताना आणि करोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी आहार आणि आयुर्वेदिक औषधे (संपर्क क्रमांक 9423511070, 7350801000). वेळ – सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी ७.०० ते ८.००.

इच्छुक व्यक्तींनी आपल्या गरजेनुरूप या डॉक्टरांशी दिलेल्या वेळेत फोनद्वारे संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने जिल्हाप्रमुख डॉ. योगेश नवांगुळ यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply