इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना विमा

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रत्येकाला पात्रतेप्रमाणे अपघात विमा देण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ५०० जणांसाठी ही योजना आहे.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटल्सने गेल्या ४ वर्षांत रत्नागिरी येथील हॉस्पिटलमध्ये सुमारे १ लाखांहून अधिक नेत्ररुग्णांवर उपचार केले असून दहा हजाराहून अधिक विविध प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गम परिस्थती लक्षात घेऊन खेड येथे सुसज्ज डोळ्यांचे हॉस्पिटल व लांजा येथे बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे त्या भागातील डोळ्यांच्या रुग्णाची सोय झाली आहे.

इन्फिगो आय केयर हॉस्पिटल्सच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून १८ मार्च २०१५ पासून मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रत्येकाला पात्रतेप्रमाणे १ किंवा २ लाखाचा अपघात विमा देण्यात येणार आहे. एकूण ५०० जणांना हा लाभ देण्यात येणार असून अतिसूक्ष्म पद्धतीने केल्या जाणाऱ्या आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेबरोबरच रुग्णांनाअपघात विम्याचा मोफत लाभ मिळणार आहे. या विम्याअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे येणारे अंशतः अथवा कायमस्वरूपी अपंगत्व, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातापासून येणाऱ्या आर्थिक संकटापासून संरक्षण मिळते.

वर्धापन दिनानिमित्त ही अभिनव योजना सुरू केली असून केल्याबद्दल सर्वसामान्यांकडून इन्फिगोचे कौतुक करण्यात येत आहे. ही योजना मर्यादित काळासाठी असल्याने शहरी भागातील व विशेषत: ग्रामीण भागातील मोतीबिंदू असणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply