रत्नागिरीत शनिवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. १० मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, भाजपा आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे आणि गुरुप्रसाद फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. हे शिबिर इन्फिगो आय केअर हॉस्पिटल (साळवी स्टॉप, रत्नागिरी) येथे होणार आहे. शिबिराचा लाभ कोणत्याही वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. ५, ६, ७ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नीलेश आखाडे यांच्या वतीने मोफत वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनीदेखील या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, अशी विनंती आखाडे यांनी केली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे त्यांनी ९८६०६२५७४०, ७३८५५३०५२१ (व्हॉट्स अॅप – ७९७२० ६१९९६) या क्रमांकावर संपर्क करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रद्धा कळंबटे, गुरुप्रसाद फाटक, नीलेश आखाडे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply