Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

गणेशोत्सवात चिपळूण–पनवेल मार्गावर कोकण रेल्वेची अनारक्षित मेमू विशेष गाडी

गणेशोत्सवात चिपळूण–पनवेल मार्गावर कोकण रेल्वेची अनारक्षित मेमू विशेष गाडी
Advertisements

चिपळूण : गणेशोत्सवाच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चिपळूण–पनवेल–चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दोन्ही दिशांना धावणार असल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण–पनवेल अनारक्षित मेमू विशेष गाडी या कालावधीत सकाळी ९ वाजता चिपळूण येथून सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५९ पनवेल–चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पनवेल येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजून २० मिनिटांनी चिपळूणला पोहोचेल. या गाडीला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण स्थानकांवर थांबा असेल. या अनारक्षित मेमू विशेष गाडीला एकूण आठ डबे असतील.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version