कोकण रेल्वेवर २४ सप्टेंबरला मुंबईसाठी दोन विशेष गाड्या

नवी मुंबई : : गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेमार्गावर रविवारी (दि २४ सप्टेंबर) दोन विशेष गाड्या धावणार आहेत. एक मडगाव – मुंबई मार्गावर, तर दुसरी खेड-पनवेल मार्गावर धावेल.

आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांची परतीसाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे या दोन विशेष गाड्यात परतीच्या प्रवासाला निघणाऱ्यांसाठी सोयीच्या ठरणार आहेत.

यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01592 क्रमांकाची विशेष गाडी मडगाव येथून रविवारी सकाळी साडेसात वाजता सुटेल आणि रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी करमाळी, थिवी, मडुरे, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, माणगाव, रोहा, पनवेल तसेच ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे. ही गाडी १८ डब्यांची एलएचबी श्रेणीतील असणार आहे.

दुसरी मेमू गाडी खेड-पनवेल मार्गावर रविवारी दुपारी धावणार आहे. 8ी पूर्णपणे अनारक्षित मेमू स्पेशल खेडपासूनच्या पुढील प्रवाशांना सोयीची होणार आहे. खेड ते पनवेल (गाडी क्र. 07102) ही मेमू स्पेशल गाडी रविवारी खेड स्थानकावरून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड तसेच रोहा येथे थांबणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply