गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची अतिरिक्त विशेष गाडी; आठ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची अतिरिक्त विशेष गाडी; आठ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू

रत्नागिरी : गणेशोत्सवातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन–लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन या मार्गावर अतिरिक्त विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीच्या चार फेऱ्या होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी १५ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी चार वाजता मडगाववरून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन विशेष गाडी १६ आणि १९ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी मडगावला पोहोचेल.
या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा असेल. गाडीला तृतीय श्रेणी वातानुकूलित तीन, शयनयान आठ, सामान्य श्रेणीचे सहा आणि दोन एसएलआर/डी असे एकूण १९ डबे असतील. गाडी क्रमांक ०१००४चे आरक्षण आठ सप्टेंबरपासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रे, इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply