नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या धावणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे-करमळी तसेच पनवेल-करमळी या मार्गांवर या गाड्या धावतील.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विशेष गाड्यांचा तपशील असा –
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – थिवी – मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज) (गाडी क्र. 01151) २२ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ या काळात मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला ही गाडी याच काळात दुपारी ३ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे स्थानकांवर थांबेल. ही गाडी २२ डब्यांची असेल. त्यात दोन टायर एसी एक डबा, थ्री टायर एसी ३, स्लीपर ११, तर सर्वसाधारा ५ डबे असतील.
२) गाडी क्र. ०१४४५/०१४४६ पुणे. – करमळी – पुणे विशेष साप्ताहिक गाडी २२ डिसेंबर आणि २९ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार २४ आणि ३१ डिसेंबर रोजी करमळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि पुण्याला त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकांवर थांबणार आहे. गाडीला २२ डबे असतील.
३) गाडी क्र. ०१४४८ / ०१४४७ करमळी – पनवेल – करमाळी विशेष साप्ताहिक गाडी शनिवार, २३ आणि ३० डिसेंबर रोजी करमळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री सव्वाआठ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमळीला पोहोचेल. ही गाडी थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकांवर थांबेल. या गाडीलाही २२ डबे असतील.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

