चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे रविवारी (दि. १९ नोव्हेंबर) डोळे, कानांचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात या शिबिराचे उद्घाटन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे.
डोळे आणि कान ही आपली महत्वाची ज्ञानेंद्रिये आहेत. त्यामुळे माणसाने या दोन्हीची काळजी घेतली पाहिजे. परंतु काही ना काही कारणाने यात बिघाड झाल्यास किंवा आपल्याला समस्या जाणवू लागल्यास त्वरित तपासणी केली पाहिजे. याकरिता शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.
आपण जे डोळ्यांनी बघतो आणि कानांनी ऐकतो ते आपण कधी ना कधी तोंडाने बोलतोच. याचाच अर्थ असा की, डोळ्यांनी बघितलेली व कानांनी ऐकलेली गोष्ट ही कधीच गुपित राहत नाही. परंतु अचानक कमी दिसू लागणे, नजर कमी होणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, डोळ्यांसमोर काळे ठिपके दिसणे किंवा -३ पेक्षा अधिक नंबरचा चष्मा असणे ही डोळ्यांची गुपिते म्हणजे मिळालेली पूर्वसूचना आहे. कमी ऐकू येणे, फोनवरील बोलणे ऐकण्यात अडचण येणे, कानांमधून शिट्टीसारखा आवाज येणे, श्रवणशक्ती कमी होणे यासारख्या कानाच्या गोष्टी ऑडिओमेट्री स्पेशालिस्टकडून ऑडिओमेट्रीसारखी तपासणी करून घ्यायला हवी.
कानाच्या आणि डोळ्यांच्या या सर्व समस्या आणि त्यांचे निदान आता एकत्रितरीत्या करून घेण्याची संधी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या विशेष प्रशिक्षित टीममार्फत व विशेष आधुनिक निदान यंत्रणेच्या सहाय्याने केले जाते.
रविवारी चिपळूणला होणाऱ्या या शिबिरात ही तपासणी मोफत करण्यात करण्यात येणार आहे. ज्यांना वरीलपैकी समस्या असतील किंवा ज्यांना ४० वर्षे पूर्ण झाली झाली असतील त्यांनी नोंदणी करून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन इन्फिगो आय केअर आणि लोकमान्य टिळक स्मारकाच्या वतीने केले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

