रत्नागिरी : स्वरूप सहकार सन्मान पुरस्कार देऊन येत्या सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) जिल्ह्यातील १० सहकार कार्यकर्त्यांना स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली. सहकार सप्ताहाच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दहा सहकार कार्यकर्त्यांना गौरविण्यात येणार असून सन्मानचिन्ह आणि ३००० हजार रुपये असे सन्मानाचे स्वरूप असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ, गृहनिर्माण चळवळ उत्तम पद्धतीने चालविली जात आहे. ही उत्तम मार्गक्रमणा शक्य व्हावी म्हणून अनेक जण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. प्रत्येक संस्थेत अशी सन्मानपूर्ती व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांच्यामधून निवड करत दहा जणांचा प्रातिनिधिक स्वरूपाचा सन्मान करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सहभागृहात हा समारंभ होईल.
या सन्मान सोहळ्याबरोबर सहकार सप्ताहाचा समारोप करताना सहकार संवाद कार्यक्रम त्याचवेळी आयोजित केला आहे. स्वरूप सन्मान वितरण आणि सहकार संवाद या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपानराव शिंदे तसेच सहकार क्षेत्रातील अन्य दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांना जिल्ह्यातील सहकारी संस्था प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

