रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणारी यावर्षीची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे होणार आहे.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ही बासष्टावी राज्य नाट्य स्पर्धा होणार आहे. रत्नागिरी केंद्रावरील या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला येत्या २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून ३ डिसेंबरला या स्पर्धेच्या समारोपाचा नाट्यप्रयोग होईल. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर ही नाट्यस्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील प्राथमिक फेरीमध्ये एकूण ६ नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकाला प्रारंभ होईल. प्रत्येक नाटकाचा तिकीट दर तिकीट दर १५ आणि १० रुपये आहे.
स्पर्धेतील नाटकांचा तपशील असा –
शनिवार २५ नोव्हेंबर – अशुद्ध बीजापोटी (लेखक : केदार देसाई दिग्दर्शक : प्रसाद धोपट, कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे). रविवार, २६ नोव्हेंबर – कोमल गंधार (लेखक: डॉ. शंकर शेष, दिग्दर्शक : संतोष सारंग, कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी). सोमवार, २७ नोव्हेंबर – परीघ (लेखक : आनंद खरबस, दिग्दर्शक : अभिजित काटदरे, कै. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण). मंगळवार, २८ नोव्हेंबर – दॅट नाईट (लेखक व दिग्दर्शक : चंद्रशेखर मुळ्ये, राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी). बुधवार, २९ नोव्हेंबर – लॉलीपॉप (लेखक : चैतन्य सरदेशपांडे, दिग्दर्शक : ओंकार रसाळ, गणेश राऊत, सहयोग, रत्नागिरी). गुरुवार, ३० नोव्हेंबर – वाटेला सोबत हवी (लेखक : गंगाराम गवाणकर, दिग्दर्शक : चंद्रकांत कांबळे, संकल्प कलामंच, रत्नागिरी). शुक्रवार, १ डिसेंबर – फूर्वझ (लेखक व दिग्दर्शक : प्रसाद पंगेरकर, श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ, जानशी, ता. राजापूर). शनिवार, २ डिसेंबर – सात-बारा (लेखक : नीलेश जाधव, दिग्दर्शक : अमित इंदुलकर, श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्था, रत्नागिरी). रविवार, ३ डिसेंबर – तथास्तु (लेखक : राजश्री साने, दिग्दर्शक : भाग्येश खरे श्रीरंग, रत्नागिरी).
स्पर्धेतील नाटकांचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विनीत विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक नंदू जुवेकर (8329221797) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक


