खऱ्या स्त्री-पुरुष समानतेसाठी महिलांना विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळणे गरजेचे : उमा प्रभू

‘महिलांना आकाशात भरारी मारायची असेल, तर पंखांची गरज नाही. शिक्षणातून मिळणाऱ्या तेजाने त्या कुठेही जाऊ शकतात. समाजात स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने यायला हवी असेल, तर केवळ प्रतीकात्मकता नको. महिलांना मनाचे, विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,’ असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि इफ्को-टोकियोच्या संचालिका उमा सुरेश प्रभू यांनी १० मार्च रोजी संध्याकाळी रत्नागिरीत केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वूमन्स फेस्ट या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

रत्नागिरी ग्राहक पेठेचे दिवाळी प्रदर्शन सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये महिला बचत गटाचे दिवाळी प्रदर्शन आज सुरू झाले.

महिलांमध्ये उत्तम उद्योजिका होण्याची क्षमता – सौ. अमृता करंदीकर

रत्नागिरी : उत्तम उद्योजिका होण्याची क्षमता महिलांमध्ये असते, असे प्रतिपादन अमृता ट्रॅव्हल्सच्या सौ. अमृता करंदीकर यांनी केले.

ग्राहक पेठेतून महिलांना सकारात्मक ऊर्जा : युगंधरा राजेशिर्के

रत्नागिरी : ग्राहक पेठेतून महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन जिल्हा महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी केले.

ग्राहक पेठेच्या दिवाळी प्रदर्शनाचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी : खास दिवाळीनिमित्त टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला उद्योगिनी, बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

कोणताही उद्योग जिद्दीने करणे आवश्यक : डॉ. श्रीधर ठाकूर

रत्नागिरी : उद्योगिनी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली विविध उद्योग करणाऱ्या महिला एकत्र आल्या आहेत. कोणताही उद्योग जिद्दीने करणे आवश्यक आहे, असे मत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी येथे व्यक्त केले.