सावंतवाडी : करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही लोकांकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील रुग्णवाहिकाचालक हेमंत वागळे या युवकाने मोफत अंत्यसंस्कार करण्याचा संकल्प केला आहे.
