रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री स्वातंत्र्याचे पूर्वरंग हा उपक्रम चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जातो. हा उपक्रम दीर्घ काळ चिपळूणमध्ये, तसेच गेली दोन वर्षे रत्नागिरीमध्ये साजरा झाला आणि त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम प्रत्यक्ष आयोजित करणे शक्य नसल्याने फेसबुक लाइव्हद्वारे त्याचे प्रसारण केले जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच कीर्तनचंद्र श्रेयस बडवे आणि कीर्तनचंद्रिका मानसी बडवे यांची कीर्तन जुगलबंदी या वेळी सादर होणार आहे.
