रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री स्वातंत्र्याचे पूर्वरंग हा उपक्रम चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जातो. हा उपक्रम दीर्घ काळ चिपळूणमध्ये, तसेच गेली दोन वर्षे रत्नागिरीमध्ये साजरा झाला आणि त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम प्रत्यक्ष आयोजित करणे शक्य नसल्याने फेसबुक लाइव्हद्वारे त्याचे प्रसारण केले जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच कीर्तनचंद्र श्रेयस बडवे आणि कीर्तनचंद्रिका मानसी बडवे यांची कीर्तन जुगलबंदी या वेळी सादर होणार आहे.
स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या, निरपेक्षपणे आपले आयुष्य देशाला अर्पित केलेल्या क्रांतिवीरांचे स्मरण करणे या उद्देशाने स्वातंत्र्याचे पूर्वरंग हा उपक्रम आयोजित केला जातो. कधी कीर्तन, प्रवचन, तर कधी व्याख्यानाच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित केला जातो. यंदा करोनामुळे हा उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून केला जाणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच कीर्तनचंद्र श्रेयस बडवे आणि कीर्तनचंद्रिका मानसी बडवे यांची कीर्तन जुगलबंदी या वेळी सादर होणार आहे. स्वातंत्र्याचा (दुरुस्त) विचार या विषयावर यंदाची कीर्तन जुगलबंदी होणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम चतुरंग प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/chaturangpratishthanofficial/) १४ ऑगस्ट २०२० रोजी रात्री नऊ वाजल्यापासून पाहायला मिळेल. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चतुरंगतर्फे करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड