‘स्त्री लिखित मराठी कविता’चे गुरुवारी पणजीत प्रकाशन

पणजी : साहित्यलेणी प्रतिष्ठान, ताळगाव संपादित स्त्रीलिखित मराठी कविता या २३ गोमंतकीय कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या गुरुवारी, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी पणजी येथे होणार आहे.

ग. दि. माडगूळकरांना पणजी येथे काव्यांजली

पणजी : गदिमांना त्यांच्या आईकडून कवितेचे बाळकडू मिळाले. आईवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांची शब्दसंपत्ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दांत सौंदर्य होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका सुकन्या सुजित जोशी यांनी केले.

उषा परब यांच्या मालवणी साहित्यात विविधता : गोव्यातील परिसंवादातील मत

पणजी : मराठी साहित्यात क्वचितच दिसणारी मालवणी भाषा उषा परब यांच्या नाटकातून जाणवते. मालवणी भाषेत मोजकेच लेखक लेखन करतात. मालवणी भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन नारायण महाले यांनी केले.