उज्ज्वला धानजी यांनी लिहिलेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर पुस्तकाचे प्रकाशन

कणकवली : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे प्रकाशन कणकवलीत नीलम कंट्रीसाइड येथे झाले.

‘… आणि अध्यक्षपद मिळण्याआधीच कृतार्थ झालो!’ : मधुभाईंची एक हृद्य आठवण

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….

सुरेश ठाकूर यांना केंद्रीय बालसेवा पुरस्कार प्रदान

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते आणि मालवण साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा केंद्रीय बालसेवा पुरस्कार बेळगाव येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला.

‘बीज अंकुर अंकुरे’च्या लेखकांचा गौरव सोहळा उत्साहात

आचरे (मालवण) : ‘बीज अंकुर अंकुरे’ पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुस्तकांच्या लेखकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

सुरेश ठाकूर यांना केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर

मालवण : आचरे (मालवण) येथील साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

शिरोडा येथे २५ डिसेंबरला दुसरे प्रेरणा साहित्य संमेलन

शिरोडा (ता. वेंगुर्ले) : आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टा संस्थेचे दुसरे प्रेरणा साहित्य संमेलन शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे.