श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी योग; गणपतीपुळ्यात विशेष बैठकीत झाले यात्रोत्सवाचे नियोजन

येत्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी असून, श्रावणात हा योग आल्याने विशेष महत्त्वाचा आहे. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यात या दिवशी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे. त्याच्या नियोजनासाठीची बैठक सात ऑगस्टला सायंकाळी गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात झाली.