विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी सायक्लोथॉनचे विजेते

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेल्या तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वात चिपळूणचे विक्रांत आलेकर विजेते ठरले. अवघ्या १ तास ३३ मिनिटांत त्यांनी ४२ किमीचे अंतर पार केले. आलेकर बंधूंनी सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक पटकावून स्पर्धा गाजवली.