रत्नागिरीत आज अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा महोत्सव

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल) रत्नागिरीत सुरू होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांच्या उन्नतीसाठी ‘अमृतपेठ’ ठरेल वरदान; कमिशनविना पोर्टलवरून विक्री

‘खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी ‘अमृत’ ही संस्था सर्वतोपरी मदत करत आहे. ‘अमृतपेठ’ हे ई-कॉमर्स पोर्टल म्हणजे त्यातील एक क्रांतिकारी पाऊल असून, त्याद्वारे संबंधित गटातील अगदी लहानातील लहान उद्योजकालाही आपली दर्जेदार उत्पादने आणि सेवा कोणत्याही कमिशनविना सर्वत्र विकता येणार आहेत. म्हणूनच संस्थेच्या सर्वच योजनांचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘अमृत’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी रत्नागिरीत केले.

खुल्या प्रवर्गासाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘अमृत’चा २१ ऑगस्टला रत्नागिरीत मेळावा

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. खासकरून खुल्या प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगार, शैक्षणिक प्रगती आणि स्वावलंबन यासाठी उपयुक्त ठरेल या अनुषंगाने हा महामेळावा होणार आहे.