‘खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी ‘अमृत’ ही संस्था सर्वतोपरी मदत करत आहे. ‘अमृतपेठ’ हे ई-कॉमर्स पोर्टल म्हणजे त्यातील एक क्रांतिकारी पाऊल असून, त्याद्वारे संबंधित गटातील अगदी लहानातील लहान उद्योजकालाही आपली दर्जेदार उत्पादने आणि सेवा कोणत्याही कमिशनविना सर्वत्र विकता येणार आहेत. म्हणूनच संस्थेच्या सर्वच योजनांचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘अमृत’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी रत्नागिरीत केले.