डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

डोंबिवलीतील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजनोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) सायंकाळी डोंबिवली (पश्चिम) येथील महात्मा फुले रस्त्यावरील मराठा हितवर्धक मंडळ हॉलमध्ये पार पडला.

डॉ. श्रीधर ठाकूर कोकणभूषण, प्रमोद कोनकर कोकणरत्न

डोंबिवली : येथील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे.

ऐतिहासिक प्रभानवल्ली गावात रंगले ग्रामीण साहित्य संमेलन

डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : मायमराठी भाषेचा गौरवदिन एका आठवड्यावर येऊन ठेपला असताना, विशाळगडाच्या पायथ्याशी, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या मुचकुंदी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावी अडीच दिवसांचा अक्षरमेळा भरला.