आसमंत बेनेवोलन्सच्या जैवविविधता उद्यानात विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालये आता हळूहळू सुरू झाली आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निसर्गात जाऊन अभ्यास करण्याची संधी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सुमारे सहा एकरवर वसलेल्या आसमंतच्या जैवविविधता उद्यानात विद्यार्थ्यांना पूर्वपरवानगीने अभ्यास करता येईल.