खेड, चिपळुणात संभाव्य पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज; जगबुडी, वाशिष्ठीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ

प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.

महाड इमारत दुर्घटनेत दोन ठार, ६० जण सुखरूप; २६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली

महाड : महाड (जि. रायगड) येथील तारीक गार्डन ही पाचमजली इमारत काल (ता. २४) कोसळली. केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. इमारतीतील ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आणखी २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.