स्वतःमध्ये बदल घडवून आणून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा – दांडेकर

रत्नागिरी : पुढची पिढी नेहमीच आपल्यापेक्षा पुढे आणि अद्ययावत असते. मात्र त्यांच्यासमोर चांगल्या आदर्शांची गरज आहे. आपण चांगले वागलो तरच हे शक्य आहे. आपण स्वतःपासूनच बदल घडवायला सुरवात केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर यांनी केले.