सावरकरांच्या अंदमान सुटकेची शंभरी साजरी करण्यासाठी आवाहन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या नेतृत्वाखाली काळ्या पाण्याच्या सुटकेची शंभरी साजरी करण्याचा आणि त्यानिमित्तायने स्वातंत्र्यवीर ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी एकत्र यावे, यासाठी राज्यभरातील प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.