सुरेश ठाकूर यांना अष्टावधानी गुरू पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेल्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार जाहीर झाला आहे. बॅ. नाथ पै सेवांगण-कट्टा यांच्यातर्फे दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो.