हृद्य सोहळ्यात राजाभाऊ शेंबेकरांचा ‘स्वराधिराज’ पदवीने सन्मान; तालयोगी पं. तळवलकर यांच्या हस्ते गौरव

कोकणाची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील लोकप्रिय गायक राजाभाऊ शेंबेकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल चाहत्यांकडून ‘स्वराधिराज’ ही पदवी देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. बुधवारी (पाच मार्च २०२५) संध्याकाळी रत्नागिरीच्या मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला असलेली रसिकांची तुडुंब गर्दी त्यांना मिळालेल्या लोकाश्रयाची साक्ष देत होती.

खल्वायन दिवाळी पाडवा मैफल कोकण गंधर्वांच्या भक्ती-भावपूर्ण सुरांनी रंगली

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल चिपळूणचे सुप्रसिद्ध गायक आणि गुरू राजाभाऊ शेंबेकर यांनी कोकण गंधर्व या त्यांना मिळालेल्या उपाधीला साजेशी आणि श्री दत्तगुरूंना समर्पित भक्ती – भावपूर्ण गीतांच्या गायनाने अविस्मरणीय केली.

खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर रंगविणार

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची २७ वर्षे सातत्याने होणारी दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल यावर्षी चिपळूणचे कोकणगंधर्व राजाराम श्रीराम ऊर्फ राजाभाऊ शेंबेकर आपल्या गायनाने रंगविणार आहेत. ही मैफल येत्या शनिवारी, दि. २ नोव्हेंबर सायंकाळी ५ ते ७ या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे.