कोकण मीडियाला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला उत्कृष्ट साहित्यिक अंक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

‘मराठीचा नुसता अभिमान नको; चांगले भाषाव्यवहार गरजेचे’

रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या नवव्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावर अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्याचा समारंभ नुकताच लांज्यातील लोकमान्य वाचनालयात पार पडला.

कोकण मीडिया लेख आणि चित्रकला स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण

रत्नागिरी : रत्नागिरीतील कोकण मीडियातर्फे दिवाळी अंकासाठी कोकणातील ग्रामदैवते या विषयावरील लेख आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण लांजा येथे येत्या रविवारी (दि. १ डिसेंबर) होणार आहे.

कोकणातील ग्रामदैवते – लेख आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर; कोकण मीडिया दिवाळी अंक लवकरच भेटीला

साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विजेत्यांचे लेख आणि चित्रांसह ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या अन्य निवडक लेखांचा समावेश असलेला साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दर्जेदार दिवाळी अंक लवकरच प्रसिद्ध होत आहे.

कोकण मीडियाचा २०२४चा दिवाळी अंक कोकणातील ग्रामदैवते या विषयावर

रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या कोकण मीडियाचा २०२४चा दिवाळी अंक कोकणातील ग्रामदैवते या विषयावर आधारित असेल. त्याकरिता लेख आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२४ ही आहे.