रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अंक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
लेख स्पर्धेत बाबू घाडीगावकर (दापोली) यांच्या लेखाला प्रथम, तर विराज चव्हाण (वाटूळ) यांच्या लेखाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तिसरा क्रमांक सौ. स्वानंदी जोगळेकर (साखरपा) आणि प्रकाश गोसावी (विरार) यांच्या लेखांना स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार-लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या लेख स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
चित्रकला स्पर्धेत सोनवडे (संगमेश्वर) येथील विष्णु गोविंद परीट यांच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, त्यांनी काढलेले चित्र अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दुसरा क्रमांक सुयोग चंद्रकांत रहाटे (नांदळज, संगमेश्वर), तर तिसरा क्रमांक साहिल सुरेश मोवळे (किरडुवे, संगमेश्वर) यांच्या चित्रांना मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कलाशिक्षक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जे. डी. पराडकर यांनी चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्यांचे लेख आणि चित्रांसह ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या अन्य निवडक लेखांचा आणि चित्रांचा समावेश असलेला साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दर्जेदार दिवाळी लवकरच प्रसिद्ध होत आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल, तसेच अंकासाठी नोंदणी करण्याविषयीचा तपशील बातमीच्या शेवटी दिला आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा हा नववा दिवाळी अंक आहे.
‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या लेख स्पर्धेला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेले लेख तपासून त्यांचे मूल्यांकन करताना परीक्षकांचा कस लागला. बहुतेक स्पर्धकांनी पन्नास टक्क्यांहून अधिक गुण पटकावले आणि पहिले तीन क्रमांक अगदी एका गुणाच्या अंतराने निघाले, अशा शब्दांत परीक्षक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी स्पर्धकांचे कौतुक केले आहे.
चित्रकला स्पर्धेविषयी…
दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘कोकणातील ग्रामदैवते’ या दिवाळी अंकाच्या मुख्य विषयावरील लेख स्पर्धेसोबतच चित्रकला स्पर्धाही आयोजित केली होती. या स्पर्धेलाही चित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील प्रथम क्रमांकाचे विजेते विष्णु गोविंद परीट यांनी काढलेले चित्र अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अन्य चित्रकारांची चित्रेही अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
अंकात काय काय?
या अंकात ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या स्पर्धेतल्या विजेत्यांचे लेख, याच विषयावरचे अन्य लेखकांचे लेख, लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे, राशिभविष्य, शब्दकोडे असा साहित्यिक फराळ वाढून ठेवला आहे.
या ८० पानी अंकाचे मूल्य १५० रुपये असून, पूर्वनोंदणी केल्यास १५० रुपयांत अंक घरपोच मिळेल. सात नोव्हेंबरनंतर नोंदणी केल्यास १५० रुपये अधिक कुरिअर चार्जेससह अंक घरपोच मिळेल. पूर्वनोंदणीसाठी आपले पूर्ण नाव आणि पिनकोडसह पूर्ण पत्ता पाठवावा. व्हॉट्सअॅप आणि गुगल-पे क्रमांक 9822255621 हा आहे.
गुगल प्ले बुक्स, बुकगंगा डॉट कॉम आणि मॅग्झटर डॉट कॉम या वेबसाइट्सवर हा अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध होणार आहे.
दिवाळी अंक घरपोच मागवण्यासाठी https://pages.razorpay.com/stores/kokanmedia/product/li_PBAiaKcc9596ex या लिंकवर क्लिक करा आणि तपशील पाठवा.
…….
याशिवाय खालील लिंकवर ईबुक स्वरूपातील अंक उपलब्ध
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details/?id=VFYrEQAAQBAJ&hl
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/90SZO
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1872110
लेख आणि चित्रकाल स्पर्धेचा सविस्तर निकाल
लेख स्पर्धा
प्रथम – बाबू घाडीगावकर, दापोली
द्वितीय – विराज चव्हाण, वाटूळ, राजापूर
तृतीय – सौ. स्वानंदी जोगळेकर, साखरपा, संगमेश्वर
तृतीय – प्रकाश गोसावी, विरार
(तृतीय क्रमांक दोघांना देण्यात आला आहे.)
…..
चित्रकला स्पर्धा
प्रथम – विष्णु गोविंद परीट, सोनवडे, संगमेश्वर
द्वितीय – सुयोग चंद्रकांत रहाटे, नांदळज, संगमेश्वर
तृतीय – साहिल सुरेश मोवळे, किरडुवे, संगमेश्वर
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

