रत्नागिरीत रंगला पहिलाच मराठी गझल मुशायरा

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जुन्याजाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक गझलांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले. गझलनवाज भीमराव पांचाळे यांची खास मुलाखतही चांगलीच रंगली.