समाजात आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत; मात्र सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर हे गुन्हे घडणार नाहीत. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले.