करोनाकाळातील मानसिक अनारोग्याविरुद्ध लढण्यासाठी “सुकून” सज्ज

करोनाच्या काळातील बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी रत्नागिरीतील मानसोपचारतज्ज्ञ मोफत मार्गदर्शन करत आहेत. “सुकून” नावाच्या या प्रकल्पाविषयीची माहिती वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर जा. प्रकल्पाविषय़ी मानसतज्ज्ञ सचिन सारोळकर यांनी मांडलेली भूमिकाही पाहता येईल. त्यांच्याच शब्दांत.

‘करोना संकट वर्षभरही राहू शकेल; मानसिकता घडवण्याची गरज’

रत्नागिरी : ‘करोनाचे संकट एक-दोन महिन्यांसाठी नव्हे, तर वर्षभरही सुरू राहू शकेल. त्यासाठी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. काया, वाचा आणि मनाचे तप या काळात प्रत्येकाने करणे आवश्यक आहे,’ असे मत रत्नागिरीतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी व्यक्त केले. करोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयीच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी पोलिसांच्या फेसबुक पेजवरून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सहभाग घेतला.