‘डॉ. विजय जोशींचे पुस्तक मत्स्यशेतीची ग्रामगीता ठरेल’

रत्नागिरी : रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय पांडुरंग जोशी यांनी लिहिलेल्या शेततळ्यातील आणि तलावातील मत्स्यशेती – तंत्र आणि मंत्र या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने रत्नागिरीत झाले. हे पुस्तक म्हणजे मत्स्यशेतीची ग्रामगीता ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकाची महती सांगितली.