हृद्य सोहळ्यात राजाभाऊ शेंबेकरांचा ‘स्वराधिराज’ पदवीने सन्मान; तालयोगी पं. तळवलकर यांच्या हस्ते गौरव

कोकणाची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील लोकप्रिय गायक राजाभाऊ शेंबेकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल चाहत्यांकडून ‘स्वराधिराज’ ही पदवी देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. बुधवारी (पाच मार्च २०२५) संध्याकाळी रत्नागिरीच्या मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला असलेली रसिकांची तुडुंब गर्दी त्यांना मिळालेल्या लोकाश्रयाची साक्ष देत होती.