दहावीच्या परीक्षेआधी आई-वडिलांचा अपघात; आईचे निधन; तरीही जुळ्या बहिणींनी मिळवले उत्तम यश

दहावीची परीक्षा अगदी जवळ असतानाच आई-वडिलांच्या अपघातामुळे त्या दोघींवर मोठे संकट कोसळले. या अपघातात त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले आणि वडील गंभीर जखमी झाले. अशा कठीण परिस्थितीतही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्धी आणि सिद्धी मांजरेकर या जुळ्या बहिणींनी आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले.

राज्यात दहावीच्या निकालातही कोकण अव्वल; ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (१७ जून २०२२) जाहीर झाला आहे.