राज्यात दहावीच्या निकालातही कोकण अव्वल; ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (१७ जून २०२२) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के, तर कोकणाचा निकाल सर्वोच्च म्हणजे ९९.२७ टक्के निकाल लागला आहे.

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असल्याची परंपराही कायम राहिली आहे. परीक्षेला बसलेल्यापैकी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार सविस्तर निकाल दुपारी १ वाजल्यानंतर विविध संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. श्री. गोसावी यांनी राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल जाहीर केला. विभागनिहाय निकाल असा –

कोकण 99.27 टक्के
पुणे 96.96 टक्के
नागपूर 97.00 टक्के
औरंगाबाद 96.33 टक्के
मुंबई 96.94 टक्के
कोल्हापूर 98.50 टक्के
अमरावती 96.81 टक्के
नाशिक 95.90 टक्के
लातूर 97.27 टक्के

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply