लांज्याच्या मुलांकडून बक्षिसाची रक्कम महिलाश्रमाला सुपूर्द

लांजा : येथील मावळा ग्रुपच्या बालकलाकारांनी स्पर्धेत पारितोषिक म्हणून मिळालेली तीन हजार ३३३ रुपयांची रक्कम महिलाश्रम संस्थेकडे सुपूर्द करून सामाजिक भानातून नवा आदर्श निर्माण केला आहे.

गडकिल्ले संवर्धनवाढीसाठी लांज्यातील शिवगंध प्रतिष्ठानची किल्ले स्पर्धा

लांजा : ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनाची वाढ व्हावी, नव्या पिढीला त्याबाबतची गोडी निर्माण व्हावी, यासाठी येथील शिवगंध प्रतिष्ठान संस्थेने किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.