‘मतदान हे केवळ औपचारिकता किंवा बटण दाबण्यापुरतं मर्यादित नसून, देशाची धोरणं ठरवणाऱ्या प्रक्रियेत आपला आवाज पोहोचवण्याचं माध्यम आहे. युवकांनी आपले विचार निर्भयपणे मांडावेत, समाजमाध्यमांवरच्या भ्रामक माहितीची पडताळणी करावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सजगपणे पुढाकार घ्यावा,’ असं आवाहन यूथ आयकॉन कमलेश सोनावणे यांनी केलं.