रत्नागिरीत महायुतीला कौल; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचा संपूर्ण निकाल

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला कौल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गटांपैकी ४१ जागा शिवसेनेला मिळाल्या असून, चार जागा भाजपला मिळाल्या आहेत.