रत्नागिरीत महायुतीला कौल; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचा संपूर्ण निकाल

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला कौल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गटांपैकी ४१ जागा शिवसेनेला मिळाल्या असून, चार जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली, मंडणगड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गटांच्या सर्व जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. (सर्व विजयी उमेदवारांची यादी बातमीच्या शेवटी दिली आहे.)

  • नऊ पंचायत समित्यांच्या ११२ गणांपैकी ७४ जागा शिवसेनेला मिळाल्या असून, त्यापैकी एक उमेदवार शिवसेना पुरस्कृत अपक्ष आहे. १४ जागा भाजपला, १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार), तर शिवसेना उबाठा गटाला ११ जागा मिळाल्या आहेत.
  • जिल्ह्यात चार गटांमध्ये आणि १४ गणांमध्ये अशा एकूण २० जागांवर भाजपला यश मिळालं आहे. शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विजयाचं श्रेय शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी आणि मतदारांना दिलं आहे.
  • लांजा तालुक्यात सर्व चारही गटांत शिवसेना, तर आठपैकी सात गणांमध्ये शिवसेना आणि एका गणात भाजप विजयी.
  • रत्नागिरी तालुक्यात सर्वच्या सर्व म्हणजे १० गटांमध्ये शिवसेना, तर २० गणांपैकी १८ जागा शिवसेनेला, तर दोन जागा भाजपला.
  • गुहागर तालुक्यात पाच गटांपैकी एक जागा भाजपला, दोन जागा शिवसेनेला, एक जागा मनसेला, तर एक जागा शिवसेना उबाठाला मिळाली आहे. गुहागर तालुक्यातील १० गणांपैकी चार जागा भाजपला, पाच जागा शिवसेनेला, तर एक जागा उबाठा शिवसेनेला मिळाली आहे.
  • चिपळूण तालुक्यातील नऊ गटांपैकी तीन जागा शिवसेनेला, दोन जागा भाजपला, तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार), तर एक जागा शिवसेना उबाठाला मिळाली आहे. चिपळूणमधील १८ गणांपैकी सात जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार), चार जागा शिवसेनेला, चार जागा उबाठा शिवसेनेला, तर तीन जागा भाजपला मिळाल्या.
  • संगमेश्वरमधील सात गटांपैकी तीन जागा शिवसेना उबाठाला, दोन जागा शिवसेनेला, एक जागा भाजपला, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मिळाली. संगमेश्वरमधील १४ गणांपैकी शिवसेनेला चार, भाजपला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) चार आणि शिवसेना उबाठालाही चार जागा मिळाल्या.
  • दापोली तालुक्यात सर्वच्या सर्व सहा गटांवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. दापोलीतील १२ गणांपैकी १० जागा शिवसेनेला, एक जागा भाजपला, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मिळाली.
  • मंडणगडमधील सर्वच्या सर्व म्हणजे दोन गट आणि चार गणांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.
  • राजापूर तालुक्यातील सहापैकी सहा गटांवर शिवसेनेने यश मिळवलं असून, १२ गणांपैकी १० जागांवर शिवसेना, एका जागेवर भाजप, तर एका जागेवर अन्य (शिवसेना पुरस्कृत) उमेदवार विजयी झाला आहे.
  • खेड तालुक्यातील सात गटांपैकी सहा जागा शिवसेनेला, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मिळाली. १४ गणांपैकी ११ जागा शिवसेनेला, एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार), तर दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली.
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply