२५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत परशुराम घाट बंद

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरचा चिपळूणजवळचा परशुराम घाट २५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.