राम मंदिराचा शिवसंकल्प

निश्चित पूर्ण होणारा संकल्प म्हणजे शिवसंकल्प होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सोडलेला असाच एक संकल्प होता तो राम मंदिराच्या उभारणीचा. निश्चित कालावधीत वेळापत्रक आखून राम मंदिराची नियोजनपूर्वक उभारणी झाली आहे आणि नियोजित तारखेला मंदिराच्या उभारणीचा संकल्प पूर्ण होणार आहे. त्यात अनेक अडचणी आल्या. पण राजकीय आणि धार्मिक इच्छाशक्तीचा योग्य उपयोग करून घेऊन, देशाच्या अस्मितेला फुंकर घालून सर्व अडचणींवर मात करून त्यांनी संकल्प सिद्धीला नेला आहे.

उद्याचे कळले, आजचे काय?

राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस दर वर्षीपेक्षाही मोठ्या थाटात या वर्षी साजरा झाला. आपल्या आमदारकीच्या काळातील बहुतेक सर्व योजनांचा आढावा त्यांनी घेतला आणि भविष्याकरिता प्रामुख्याने काही कोटी रुपयांच्या पाणी योजना प्रस्तावित असल्याचे जाहीर केले. वाढदिवस हे केवळ निमित्त होते. विधानसभेची आगामी निवडणूक होण्यापूर्वीचा हा वाढदिवस असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. त्या निमित्ताने विकासकामांचा आढावा घेणे अत्यंत समयोचित होते. पण…

पर्यटकांसाठी स्व-संरक्षणाचे सूत्र

नजरेत न मावणाऱ्या अथांग सागराच्या किनाऱ्यावरचा अनुभव स्वतःला विसरायला लावणाराच असतो. त्यातही किनारपट्टीच्या प्रदेशात वास्तव्य नसलेल्यांना तर या अनुभवाचे विशेष अप्रूप असते; मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळेही हा अनुभव जीवनाची अखेर करू शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात असणे, धोक्याच्या सूचनांचे फलक लावणे, दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा आणि अँब्युलन्ससह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आदी बाबी अपरिहार्यच आहेत; मात्र पर्यटकांनी स्वतः सावध असणे हे त्याहून किती तरी महत्त्वाचे आहे.