शारदोत्सवानिमित्त आगाशे विद्यामंदिरात पाककृती स्पर्धा; पालकांचा चांगला प्रतिसाद

शारदोत्सवानिमित्त आगाशे विद्यामंदिरात पाककृती स्पर्धा; पालकांचा चांगला प्रतिसाद

भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक
विद्यामंदिरात सध्या शारदोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत
आहेत. अन्नपूर्णा हे शारदामातेचे एक रूप. त्या रूपाची आराधना करण्याच्या
हेतूने विद्यामंदिरात आज (१३ ऑक्टोबर) पालकांसाठी पौष्टिक पाककृती स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते.