शारदोत्सवानिमित्त आगाशे विद्यामंदिरात पाककृती स्पर्धा; पालकांचा चांगला प्रतिसाद

शारदोत्सवानिमित्त आगाशे विद्यामंदिरात पाककृती स्पर्धा; पालकांचा चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात सध्या शारदोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अन्नपूर्णा हे शारदामातेचे एक रूप. त्या रूपाची आराधना करण्याच्या हेतूने विद्यामंदिरात आज (१३ ऑक्टोबर) पालकांसाठी पौष्टिक पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पौष्टिक कटलेट आणि पौष्टिक लाडू अशा दोन प्रकारचे पदार्थ या स्पर्धेसाठी आणायचे होते. या स्पर्धेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण ११ प्रकारचे लाडू आणि १६ प्रकारची कटलेट्स सादर करण्यात आली होती. त्यात सुक्या मेव्यापासून मखानापर्यंत वेगवेगळ्या घटकांपासून तयार केलेले लाडू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांपासून ते मक्याच्या दाण्यांपर्यंतच्या वेगवेगळ्या घटकांपासून तयार केलेली पौष्टिक, चविष्ट कटलेट्स पालकांनी या स्पर्धेसाठी तयार करून आणली होती. आकर्षक सजावट करून पदार्थ मांडण्यात आले होते.
समिता शेट्ये आणि अनुजा आगाशे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सहभागी झालेल्या सर्वांनीच चांगले पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगतानाच परीक्षक शेट्ये यांनी सर्वांना पदार्थ अधिक चांगला होण्यासाठी काही टिप्स दिल्या. व्यग्र दिनक्रमातून वेळात वेळ काढून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पालकांचे मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी कौतुक केले. तसेच, शारदोत्सवातील अन्य कार्यक्रमांमध्येही सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ. गीता सावंत यांनी आभारप्रदर्शन केले. सर्व सहभागी स्पर्धकांना मनःशक्ती केंद्राच्या प्रार्थनेचे पुस्तक भेट देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
पौष्टिक कटलेट
प्रथम : सौ. राधिका राजेंद्र जाधव
द्वितीय : सौ. मैत्रेयी केळकर
तृतीय : सौ. श्रेया श्रीकांत पवार
उत्तेजनार्थ १ : सौ. स्वाती संदीप मुकादम
उत्तेजनार्थ २ : आफसीन मुजम्मील नाकाडे
पौष्टिक लाडू
प्रथम : सौ. परिधी पराग रहाटे
द्वितीय : सौ. सीमा प्रसाद हातखंबकर
तृतीय : सौ. नमिता कौस्तुभ घवाळी
उत्तेजनार्थ १ : सौ. त्रिशा गुरव उत्तेजनार्थ
२ : सौ. अनुप्रीती अनिकेत कोनकर

दरम्यान, सोमवारी (१२ ऑक्टोबर) विद्यामंदिरात ‘शारदामातेचे माहात्म्य’ या विषयावर ह. भ. प. प्रवीण मुळ्ये यांचे चौथीच्या मुलांसमोर सुश्राव्य कीर्तन झाले. विद्यार्थ्यांनी अभ्यास का व कसा करावा आणि अभ्यास केल्यावर शारदामाता त्यांना उज्ज्वल यश कसे प्राप्त करून देते, हे विषय त्यांनी मुलांसमोर गोष्टीरूपाने प्रभावीपणे मांडले. त्यांना संकेत पाडळकर यांनी तबल्याची, तर शंतनू सावंत यांनी हार्मोनियमची साथसंगत केली. (कीर्तनाचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply